जे. एस. एम. महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव उत्साहात साजरा
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
जे. एस. एम. महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव उत्साहात साजरा
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जे. एस. एम. महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी महिन्यामध्ये संविधान गौरव महोत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाविदयालयातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती व्हावी याकरिता निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, संविधान महोत्सव रॅली व जनजागृतीपर व्याख्यान असे विविध कार्यक्रम जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले.
गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी *भारतीय राज्यघटनेची ओळख* या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी *भारतीय संविधान* या विषयावर प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. महाविद्यालयातील सुमारे 230 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
सोमवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी जे.एस. एम. कॉलेजव अॅड. दत्ता पाटील काॅलेज आॅफ लॉ, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने *संविधान गौरव रॅलीचे* आयोजन करण्यात आले होते. ही रॅली अलिबाग शहरातून काढण्यात आली. १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला.
याच दिवशी *भारतीय संविधानाची ७५ वर्ष* या विषयावर महाविद्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. पी. बी. आचार्य उपस्थित होते.
आचार्य सरांनी भारतीय संविधानाचे महत्व, आपले मूलभूत हक्क, भारतीय संविधान व महिलांचे हक्क या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.आय. पी. कोकणे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ.पंकज घरत यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.



