
0
6
2
9
0
4
गुरू दीपस्तंभ
अंधारल्या वाटेवरती
जेव्हा दिशा कळेना
तेव्हा गुरू तुझ्या ज्ञानाने
जीवनाला अर्थ मिळाला
गुरू दीपस्तंभ तू
अथांग या सागरी
तुझ्या प्रकाशात दिसते
किनारा हा पैलतीरी
तू शब्द नाही मंत्र आहेस
तू वाट नाही मार्ग आहेस
गुरू तुझ्या मार्गदर्शनाने
पंखांना बळ येत आहे
पुस्तकातले ज्ञान नव्हे
जीवन जगणे तू शिकवले
पडलो जेव्हा तूच सावरले
हरलो जेव्हा तूच जिंकवले
गुरू दीपस्तंभ तू जगाचा
तूच आहेस खरी दिशा
तुझ्या चरणी ठेवते मी
माझी ही नमन निशा
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
============
0
6
2
9
0
4



