आवास मध्ये भारतमातेच्या ७६ व्या प्रजासत्ताकदिनाचा सोहळा उत्साहात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
आवास मध्ये भारतमातेच्या ७६ व्या प्रजासत्ताकदिनाचा सोहळा उत्साहात
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग: रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळ, आवासच्या शैक्षणिक संकुलात आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळ, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर काॕलेज, पूर्व प्राथमिक व स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा यांनी भारतमातेच्या ७६ व्या प्रजासत्ताकदिनाचा सोहळा मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून व सुनियोजनातून उत्साहात साजरा केला.
सर्वप्रथम प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. १२ वीच्या विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर आ.सा.धो. रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम व इ. १० वी अ मधील विद्यार्थी राज पोवळे यांने परेड करून आमंत्रित केले व खजिनदार सुवर्ण कांबळी यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले.
त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ७ वी ते इ. ९ वी च्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या पथकाने संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला व मान्यवरांना सलामी दिली. त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी झेंडा गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर प्रतिज्ञा म्हणण्यात आली व नंतर इ.५ वी ते इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांनी झाला आनंद आली बहार हे कृतीयुक्त गीत सादर केले.
या कार्यक्रमास आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी, सचिव प्रभाकर म्हात्रे, सभासद सुहास म्हात्रे, सभासद दिपक राऊळ, ग्रुप – ग्रमपंचायत माजी सदस्या ज्योती पवार, समाजिक कार्यकर्ते रोहिदास थळे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, माजी जेष्ठ शिक्षक महादेव कोळी सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा रणिता म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर प्रजासत्ताकदिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची शाळेपासून ग्रुप – ग्रामपंचायत, आवास पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभातफेरी मध्ये देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. आपल्या भारतमातेचा जयघोष करण्यात आला.
प्रभात फेरी ग्रुप – ग्रामपंचायत, आवास येथे पोहोचल्या नंतर सर्व प्रथम प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. १२ वीच्या विद्यार्थीनींच्या लेझीम पथकाने लेझीम प्रात्यक्षिक करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांना ध्वजारोहणासाठी क्रीडा शिक्षिका प्रियंका राणे मॕडम व इ. १० वी अ मधील विद्यार्थी राज पोवळे यांने परेड करून आमंत्रित केले व सरपंच अभिलाषा अभिजीत राणे यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर प्रियंका राणे मॕडम यांच्या मार्गदर्शनातून इ. ७ वी ते इ. ९ वी च्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या पथकाने संचलन करून राष्ट्रीय ध्वजाला व मान्यवरांना सलामी दिली त्यानंतर यतिश शिंदे सर व विशाल पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थीनींनी झेंडा गीत व देशभक्तीपर गीत सादर केले.
त्यानंतर प्रतिज्ञा म्हणण्यात आली व तंबाखू मुक्तीची उपस्थित सर्वांनी शपथ घेतली. त्यानंतर इ.५ वी ते इ. ७ वी च्या विद्यार्थ्यांनी झाला आनंद आली बहार हे कृतीयुक्त गीत सादर केले. त्यानंतर बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्जुनिअर कॉलेज, आवासच्या रणजीत राणे क्रीडा व सामाजिक विकास मंडळाच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी वंदेमातरम् या देशभक्तीपर गीतावर केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास ग्रुप – ग्रामपंचयत सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, ग्रुप ग्रामपंचायत, आवास माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आ.सा.धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे खजिनदार सुवर्ण कांबळी, सचिव प्रभाकर म्हात्रे, सभासद सुधाकर राणे, सभासद दिपक राऊळ, सभासद सुहास म्हात्रे, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक/माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, माजी पर्यवेक्षक दामोदर गावडे सर, माजी जेष्ठ शिक्षक महादेव कोळी सर, माजी वरिष्ठ लिपिक प्रकाश राणे सर, बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे विद्यमान मुख्याध्यापक/प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी गणेश राणे सर, स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रसिका म्हात्रे मॕडम, पूर्व प्राथमिक शाळा प्रमुखा रणिता म्हात्रे मॕडम, सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि मोठ्या संख्येने आवास ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी केले.
शेवटी सर्व उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले.



