0
4
8
2
9
7
पंढरीची वारी
विठ्ठलाशी. हितगूज
शब्दाविना नित्य चाले
वारकरी पांडुरंगा
जणू एकरूप झाले
पायी पंढरीची वारी
मायबापा आलिंगन
भेटे रखुमाईवर
झाले जगणे पावन
टाळ मृदंगाचा नाद
दावी पंढरीचे सुख
डोळे भरून पाहावे
श्रींचे गोजिरे सुमुख
विठू माऊली.सर्वज्ञ
भक्ती निःस्वार्थ करावी
आयुष्याची झोळी सदा
पुण्य जोडून भरावी
ध्वज भगवा हातात
विठूनाम मनी स्मरा
हेच मागणे श्रीहरी
कृपाछत्र शिरी धरा
सचिन पाटील
अलिबाग,रायगड
0
4
8
2
9
7



