Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूर

“आभारीय मनोगत”; डॉ संजय पाचभाई

0 4 8 2 9 3

आभारीय मनोगत”; डॉ संजय पाचभाई

‘आता रं..?’ या माझ्या बालकाव्याला सर्वोत्कृष्ट स्थान दिल्याबद्दल आदरणीय राहुल सर, परीक्षक मंडळ आणि समूहातील माझे स्नेही यांचे खूप खूप धन्यवाद.

‘यशस्वीतेची वाट’ या विषयावर आज मला का कोण जाणे कठीण गेले म्हणून बाल काव्याकडे नजर वळली आणि अगदी सहज पंधरा मिनिटात दोन रचना लिहून झाल्या. सकाळी राहुल सरांचा मेसेज पाहिला आपला फोटो पाठवा वाचून खूप आनंद झाला.

पण…दुःखही वाटले. कारण, समूहात आज रचना खूपच कमी चला म्हटले आज वासरात लंगड़ी गाय शहाणी असो. आज सकाळी नेहमीप्रमाणे साडे नऊ ला आम्ही दोघेही दवाखान्यात यायला निघालो आज गुरुवार साई मंदिर अगदी जवळ दर्शन घेतले आणि निघालो पुढे वळणावर मागून स्कूल वैन नि आमच्या गाडीला ठोस मारली आम्ही दोघेही दूर फेकल्या गेलो पण फक्त खर्चटलं मार असा जास्त लागला नाही.

पण दुःखाची गोष्ट म्हणजे मी 1 मिनिट रोडवर पडून होतो पण एकही व्यक्ति मदतीला आली नाही तीनेच स्वतः उठून मला आधार दिला..माणुसकी मेली का?आपण इतके कसे भावना शून्य झालोत. नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणारे आम्ही आमच्या मदतीला कोणी येवू नये, सर्व अनाकलनीय देवाचे आभार मानून आपल्या दवाखान्यात आलो पण ती घटना आठवून मन खिन्न झाले आणि आजच्या बालकाव्याचा विषय आठवला ‘आता रं..?’

मांगून मारली ठोस
उताणं पडलं म्हातारं
कोणी उचलाले आलं नायी
बूड्डी विचारते आता रं..?

मृद्गंध✍️
डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर
सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे