
0
4
8
2
9
0
झेप क्षितीजापलिकडे
संसाराच्या खेळामधले
राजा आणिक राणी
निराशेच्या अंधारातील
अशीच एक विराणी
अचानक आक्रीत घडले
दुष्काळाचे संकट आले
शेतातील पीक करपूनी
जगणेची मुश्किल जाहले
कभिन्न अंधाऱ्या रात्री
दीप आशेचा तेवला
उर्मीने मनात आता
प्रकाश कवडसा पडला
होती जिद्दीची तर राणी
राजाचा आधार झाली
बळ एकवटूनी तीच आता
दुःखावरी सवार झाली
झेप क्षितीजा पलिकडे घेण्या,
बळ होआत्म विश्वासाचे
राजाराणीच्या संसारी
फुलले झाड सौख्याचे
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
========÷
0
4
8
2
9
0



