‘वसुधा नाईक’ यांना डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
वसुधा नाईक पुणे
‘वसुधा नाईक’ यांना डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
पुणे : (दि. 11 सप्टेंबर) सेवानिवृत्त शिक्षिका सौ.वसुधा नाईक यांना मधुरंग संस्थेतर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर ब्रम्हध्यान विश्वपीठाचे संस्थापक-अध्यक्ष आणि पहिल्या विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते नुकताच 2024 चा ‘ डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार ‘प्रदान करण्यात आला.
सौ.वसुधा नाईक यांनी केवळ शाळेतील मुलांना पाठ्यपुस्तकातले धडे शिकवले नाहीत तर त्यांनी मुलांना माणसं वाचायला शिकवली. मुलांमधे समरस होऊन त्यांचे आयुष्यच घडवले.विद्यार्थ्यांना मातेचे प्रेम दिले.त्यांचे हे दैदीप्यमान योगदान निश्चितच गौरवास्पद आहे . ” असे प्रतिपादन सौ.नाईक यांना पुरस्कार प्रदान करताना काढले.
या नेत्रदिपक यशाबद्दल साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक, तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया दामले, भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या महिला आघाडी शहराध्यक्ष भारती महाडिक, वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका उर्फ सारिका सासवडे, महिला सन्मानच्या सचिव दीपाराणी गोसावी, युनिव्हर्सल युथ च्या सहसचिव सुचेता प्रभुदेसाई आदिंनी सौ.वसुधा नाईक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. सौ.वसुधा नाईक या ज्येष्ठ साहित्यिक असून त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
सौ.वसुधा नाईक पर्यावरण तसेच महिला सबलीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, सुरक्षा, बाल कल्याण संवर्धन आदि विविध पातळीवर गेल्या तीन तपांहून अधिक काळ कार्यरत आहेत.सौ.वसुधा नाईक या महाराष्ट्र पोलिस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असून वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. महिला सन्मान संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत. वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून त्या अनेक कलावंतांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानित करत असतात.



