
0
4
8
2
9
7
आमच्या बाई
उपक्रमशील शिस्तप्रिय
आहेत छान आमच्या बाई
वर्गात आल्या की त्यांना
शिकवण्याची असते घाई
चिंचोके, मण्याची माळ
मोजून गणित सांगतात
गटात बसवून मुलांना
शैक्षणिक साहित्य देतात
चित्र अक्षर कार्ड घेऊन
अक्षर ओळख करतात
गाणी,गोष्टी, खेळ घेऊन
आनंददायी शिक्षण देतात
आमच्या भल्यासाठीच
कधी रागावतात मारतात
प्रेमाने जवळ घेऊन त्या
अभ्यास करवून घेतात
घरोघरी जाऊन मुलांच्या
पालकांच्या भेटी घेतात
मराठी शाळेतच शिकवा
आमच्या बाई सांगतात
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
========
0
4
8
2
9
7



