Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासच्या शिरपेचात ‘माझी शाळा सुरक्षित शाळा’ हा सन्मानाचा तुरा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आवासच्या शिरपेचात ‘माझी शाळा सुरक्षित शाळा’ हा सन्मानाचा तुरा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: (दि.३१): बालगंधर्व रंगभवन, रिलायन्स टाऊनशिप – नागोठणे येथे रायगड पोलीस आयोजित रस्ता सुरक्षा अभियान – २०२५ अंतर्गत सुरक्षित शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात रायगड जिल्हातील ५०० शाळांमधून २८ शाळांची निवड करून त्यांचा माझी शाळा सुरक्षित शाळा हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला.

यामध्ये आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासला रायगड पोलिसांतर्फे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आदर्श कार्यपद्धतीने कौतुकास्पद उपाययोजना राबवित असल्याबद्दल ‘माझी शाळा सुरक्षित शाळा’ हा सन्मान महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती सुनिल तटकरे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, पेण मधील अधिकारी देवकाते तसेच पोलीस दलातील इतर मान्यवर अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला. शाळेच्या वतीने हा सन्मान जेष्ठ शिक्षक कैलास शिकारे सर यांनी स्विकारला.

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास हे एक नाव नाही तर हे एक नातं आहे. आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या अंतर्गत येणारी बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास ही एक प्रतिष्ठित शाळा शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिली आहे आणि आता तर या शाळेने ग्रुप – ग्रामपंचायत, आवास माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य अभिजीत प्रभाकर राणे, संस्थेचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद यांच्या बहुमोल सहकार्याच्या आणि योगदानाच्या जोरावर ‘माझी शाळा सुरक्षित शाळा’ हा सन्मान मिळून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे, यशाचं उत्तुंग शिखर गाठलं आहे. आणि त्यामुळे शाळेचा नावलौकिक अधिकच वाढला आहे.

शाळेच्या आणि संस्थेच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून व पालक वर्गातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

‘माझी शाळा सुरक्षित शाळा’ हा सन्मान शाळेला मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले आणि त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे