Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

बाप

कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

0 4 8 2 9 0

बाप

बाप घराचा खरा नायक
दिनरात राब राबतो शिवारी
फाटक्या वाहना घाली पायी
लेकरासाठी घेतो नवा भारी

बापाची माया लपली उरात
अश्रू न दाखवी कधी डोळ्यात
हृदयात एकच सपान जपतो
पोराचा आयुष्य कसे जाई सुखात

माय माझी रेशमी तलम शाल
बाप बनतो समशेरीची ढाल
खस्ता खाऊनी पोसतो पोरबाळ
घरदार नांदते सारेच खुशाल

बाळ घसरून खाली पडले
वेदना होतात बापाच्या उरात
हृदय त्याचे येई भरून
तळहातावरच्या फोडावाणी जपत

पिकलं पान कधी गळून पडेल
काय भरोसा सांगू शकेन कोणी
अवहेलना नका करू जन्मदात्याची
दुनिया दाविली तुम्हास जयांनी

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे