Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

सुखाच्या वाटा; सरला टाले

0 4 8 2 8 6

सुखाच्या वाटा

श्वासागणिक रुतवून घेतलात
बाबा तुम्ही काळजात काटा
शोषितांसाठी शोधून काढल्यात
निरंतर सुखाच्या वाटा ॥

समाज बांधवांसाठी
तुम्ही स्वप्न पाहिले
सत्ताधारक बनावे म्हणून
अर्धपोटी रात्रंदिन झटले ॥

शिकल्या सवरल्या लोकांनी
केला तुमचाच विश्वासघात
क्षणिक सुखाला बळी पडून
स्वप्नांवरच केला आघात ॥

एकटे लढलात तुम्ही अन्
मन पिळवटणारी संकटे झेललीत
आशा लावलीत ज्यांच्यावर
स्वार्थ बाजारात विकाऊ निघालीत ॥

जा आणि सांग त्यांना
शेवटचा तो आटापिटा
चळवळ कायम असू द्यावी
अन् शोधलेल्या सुखाच्या वाटा ॥

सरला टाले
राळेगाव यवतमाळ
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे