‘भिजल्या मातीचा सुगंध’ असाही दरवळवतो तेव्हा…’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे परीक्षण
‘भिजल्या मातीचा सुगंध’ असाही दरवळवतो तेव्हा…’; शर्मिला देशमुख
मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचे परीक्षण
बालकाव्याची सुंदर पहाट
फुललेल्या धरतीचा सुंदर घाट
भिजली माती रुजली नाती
स्पर्धेची झाली किती सुंदर सुरुवात.
मराठीचे शिलेदार समूहात ‘आम्ही बालकवी” समूहात स्पर्धेच्या निमित्ताने ” भिजली माती ” हा राहुल दादांच्या अनमोल कल्पकतेतून बालकाव्य स्पर्धेसाठी विषय आला आणि भिजलेल्या मातीचा सुगंध पूर्ण समूहात दिवसभर दरवळला. भिजलेल्या मातीतून जणू बालकाव्यांची बीजे रुजून जोमाने फोफावली आणि हा हा म्हणता वृक्षच बनला.
जेव्हा, ‘पहिला पाऊस’ धरतीच्या मिलनासाठी येतो आणि माती हर्षाने ओलीचिंब होते, त्यावेळी तिचा दरवळणारा सुगंध हा अवर्णनीयच. जगातील कोणत्याही सुगंधापेक्षा श्रेष्ठच ! जणू माती उचलावी आणि कृष्णाने जशी माती पटकन खाल्ली तशी खावी, अशी भावना मनात नेहमीच तरळते. अशी या भिजलेल्या मातीची महती. ‘आम्ही बालकवी’ समूहात दिलेल्या या विषयावर विविध अंगी लेखन झाले. सर्व समूहातील सदस्य जणू पडणाऱ्या पावसात प्रत्यक्षात भिजून भिजलेल्या मातीत नाचत आहेत असा क्षणभर भास झाला. भिजलेल्या मातीपासून विविध आकार, खेळण्या, गणपती बनवण्यात सारेच कसे रमले होते .सर्वांनी पडलेल्या सरीत नाचून चिखलात फसण्याचा अनुभव पुनश्च अनुभवला आणि बाल जीवनातील आनंद पुन्हा पुन्हा उपभोगला म्हणावयास हरकत नाही.
श्रावण सरींनी चिंब चिंब भिजलेली हिरवळ ,आनंदलेले पशुपक्षी, लहान मुलांच्या आनंदाला उधान देऊन उड्या मारण्यास भाग पाडणारे बेडूकराव ,पिके ,शेतजमीन, शाळा ,वृक्षारोपणाचे महत्त्व, मैत्रीची भावना, चिखलात उमटणाऱ्या पाऊल खुणा, पावसांच्या धारांमुळे मातीला होणारा आनंद, पावसात भिजण्याची मजा, मातीच्या भांड्यांमधील खोटा खोटा स्वयंपाक, पूर ,कागदी नाव ,डबक्यातील पाणी उडवून केलेल्या खोड्या ,चिखलात चालताना येणारी मजा अशा एक ना अनेक बालकल्पना बालकव्यातून फुलल्या आणि सर्व समूहच जणू ओल्या मातीत खेळून बागडून आला.
नेहमीच कल्पनेला वाव देऊन कल्पकतेला चालना देणारे राहूल दादा बालकव्यातही ‘भिजली माती’ हा जिव्हाळ्याचा विषय देऊन अग्रेसर ठरले. सर्व बालमनाच्या बालकाव्य रसिकांना पुढील लेखनासाठी भरभरून शुभेच्छा ! बालपणात जाऊन बालकाव्य लिहिण्यास प्रेरित करणाऱ्या राहुल दादांना पुनश्च नमन ! मला परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल शतशः आभार ! धन्यवाद !!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
सहप्रशासक, संकलक, परिक्षक
मराठीचे शिलेदार समूह



