Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

चला गाऊन तर बघू या…!!

संकलन: सौ.पल्लवी पाटील, नागपूर

0 4 8 2 9 0

चला गाऊन तर बघू या…!!

कांदे पोहे

भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी
हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन् कांति
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

नात्यांच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा ठरवि शतजन्माच्या गाठी
रोज नटावे रोज सजावे धरून आशा खोटी
आले मिटूनी लाजाळुपरी पुन्हा उघडण्यासाठी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

दूर देशीच्या राजकुमारा ची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागुन ध्यानी मनि नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतास मग जपताना
अन मग डोळे उघडावे हे दिवास्वप्न पहाताना
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

भुतकाळच्या धुवून अक्षता तांदुळ केले ज्यांनी
आणि सजवाला खोटा रुखवत झाडांच्या फाद्यांनी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टहास ही त्यांचा
हातावरच्या मेंदीवर ओतून लिंबाचे पाणी
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे

संकलन: सौ.पल्लवी पाटील, नागपूर
गीतकार : अवधूत गुप्ते, गायक : सुनिधी चौहान, संगीतकार : अवधूत गुप्ते, गीत संग्रह / चित्रपट : सनई चौघडे (२००८)
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे