मी श्रेष्ठ; कुसुमलता वाकडे
मी श्रेष्ठ
लाडू म्हणती खमंग तुपात भाजुनी
बुंदी,बेसन,मोतीचूर आम्हा पाहूनी
लग्न, मुंज वा असो बारसे बघुनी कार्यक्रमात
मी आहे श्रेष्ठ सर्वाहूनी
सारण भरूणी तिळ, रव्याचा
आकर माझा येई रूप जन्मास
म्हणतात मला सुंदर पहा करंजी
मारू नका रे तुम्ही फुका बढाई
लावी पणाला मी सुगरणीला
लागता दृष्ट फुटती मी तेलात
असली मी जरी पगंतीत कमी
तरी लाडकी अनारसे ताटात
गुलाबजाम गडगडला व्हा बाजुला
टाकूणी दुध वेलची पिस्ता साखर
गुलाबपाणी घालताच होई सुगंधी
लुसलुशीत चाखत सदैव ओठावर
काटेरी अंग जरी माझे मी चकली
नेहमी तरी खमंग माझा हा स्वाद
गोड खाऊन जेव्हा येती कंटाळा
एकच तुकडा खाता देती मला दाद
भुक भागवी जी नेहमी दुसर्याची
गृहिणी जेव्हा घडवी वेगळेआकार
श्रेष्ठत्व मिळे का कुणाला भांडूणी
भिन्न भिन्न चव तुमचे रंगरूप फार
अन्नदेवता मनात हसली
वाद कसला भोळा हा ऐकुणी
सर्व लेकरे माझीच रे तुम्ही
जिभेवर तुम्ही समान सर्वांसनी
सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर
===========



