0
4
8
2
9
0
रिंगण
विठू नामाच्या गजरात
चालू,आषाढी वारी
नाचू,टाळ विना घेऊनी
जयघोष, निनादे हरी हरी.
डोई घेऊन तुळशी वृंदावन
चालल्या भगिनी वारकरी
ओव्या अभंग गाणी गात
मना येई भक्तीची उभारी.
सोडुनी सर्वं भेदाभेद
समतेचा संदेश देती,
आम्ही विठूमाऊली ची, लेकरं
साऱ्या जगाला वंदिती.
जयघोष निनादतो
नामा तुकोबाचा,
भक्ती भावात न्ह्याती
रिंगण क्षण आहे आनंदाचा.
भेटीलागी जिवा
लागलीशी आस,
विठ्ठल रुखमाई पाहण्याची
लागली मना आस.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
=========
0
4
8
2
9
0



