Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

रुतबा ( गझल )

प्रभु फुलझेले, नागपूर

0 4 8 2 9 3

रुतबा ( गझल )

मराठमोळ्या ओठावरचे गान मराठी
सरगमच्या कंठातील जीव प्राण मराठी

आली नेसून नववार अन् पदर भरजरी
नाकी नथनी टिळा कपाळी जाण मराठी

भाग्य लाभले मातीला या थोर विभूती
जगात अवघ्या गाजे रुतबा खाण मराठी

संत तुका अन् बोल कबीरा बयनाबाई
उभे ठाकले इतिहासाला पान मराठी

साहित्याचा झरा निपजला ज्ञान वर्धना
वाटा किती तरी संपेना दान मराठी

कोमल मृदमय कधी करारी भिडे जिव्हारी
नाठाळाची वाट लावते बाण मराठी

काना मात्रा उकार थांबा विश्रांती घ्या
जोडी नाते संवादाचे मान मराठी

फुलवी वसंत जीवनात या पानोपानी
सुगंध दरवळ प्रीतीचा हे रान मराठी

देऊ काय नावच कळेना प्रीतीला प्रभु
चुकवी ठोका ह्रदयाचा हे वाण मराठी

प्रभु फुलझेले, नागपूर
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे