0
4
8
2
9
0
माणुसकी
माणसात आता तर
नाही दिसणार माणुसकी
नका शोधू तुम्ही
त्यांच्यातील आपुलकी.
प्रत्येक माणूस झाला आहे
खूप असा स्वार्थी
नाही होणार आता
कधीच तो निस्वार्थी.
त्याला चढली धुंदी
आपल्या श्रीमंतीची
अती गर्व करतो आहे
आपल्या संपत्तीची.
रक्ताचे नाते नावापुरते
जगाला दाखवायला
प्रत्यक्ष भेटल्यावर
खरे नाते कलंक लागला.
आजच्या कलियुगात
नाती विसरत चालली
म्हणून तर माणसातली
माणुसकी लोप पावली.
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
==========
0
4
8
2
9
0



