Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

सोशल मिडीयातील ‘फेक’ खात्याला ‘ब्लॉक एन्ड रिपोर्ट’ चा चाप

तृप्ती पाटील मालाड (ईस्ट) मुंबई

0 4 8 2 8 6

सोशल मिडीयातील ‘फेक’ खात्याला ‘ब्लॉक एन्ड रिपोर्ट’ चा चाप

समाज माध्यमात काही पुरुष व महिला मुलांच्या नावाने ‘फेक अकाउंट’ उघडतात. पुरुष हे मुलींच्या तर स्त्रिया या मुलांच्या नावाने मुलांशी चॅटिंग करत असतात. काही पुरुष महाभाग हे स्त्रियांच्या नावाने स्त्रियांशी चॅटिंग करतात. या चॅटिंगमुळे फसवणूक वैचारिक मतभेद किंवा पैसा उधळला जातो. ‘फेक अकॉउंट’ हे फेसबुक व इन्स्टाला लागलेली सडकी कीड आहे. सडलेल्या मेंदूची निर्मिती म्हटले तरी वावगे ठरणार नाही. खरे पाहता हे एकतर मानसिक रुग्ण असतात, नाहीतर गुन्हेगार असतात. झटपट पैसे कमविण्यासाठी असे कृत्य करतात. काही वेळेलाच स्त्री पुरुष हे दोन्हीही बळी पडतात. जास्तीत जास्त फेक अकाउंटवाले हे पैसे उकळतात. त्यांचा हेतूच पैसा कमविणे हा असतो.

दुसरे महिलांचे अश्लील फोटो, व्हिडिओ टाकून फेसबुक वरती भरपूर लाईक कमेंट्स करून पैसा कमावतात. अश्लील मेसेज पुरुषांना, महिलांना सतत करतात. महिलांच्या नावाचा ‘फेक अकाउंट’ काढून महिलांना अक्षरश: बेअब्रू करण्याचा सपाटा यांनी लावलेला आपण सतत पाहतो. पण समाज म्हणून आपण ढिम्मपणे फक्त वाचतो. यावर कधी कुठे संताप व्यक्त होतांना दिसत नाही. दिसला तरी न्यायिक कारवाई होत नाही. काही वेळेला कळत पण नाही की हा पुरुष आहे की महिला. महिलांच्या अश्लील फोटोचा वापर करून आपले लाईक फॉलोवर्स वाढवण्यासाठी भरपूर पैसा कमावतात. पण त्या ज्या महिलेच्या अश्लील फोटो फेसबुक, सोशल मीडिया वरती टाकले जातात त्या महिलेला मात्र पूर्ण बेअब्रू करून त्यांचा संसार बरबाद करून टाकतात. त्याबरोबर इतर पुरुषांची मैत्री ठेवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. काही वेळेला कमविलेले कष्टाचे पैसे ह्या लोकांच्या घशात जातात. त्यांना फसवलं जातं. हे फेक अकाउंट काढणारे महिला पुरुष स्वतःच्या जीवनाचा लोकांची फसवणूक करून आनंद घेतात. पण दुसऱ्यांना दुःख देऊन आपण या जगात कधी सुखी राहू शकत नाही. हे मात्र फेक अकाउंटवाले ओळखू शकत नाही.

या फेक अकाउंट वाल्यांना भरपूर स्त्री पुरुष हे बळी पडले जातात. सर्वात महत्त्वाचे फेक अकाउंटवाले आपली प्रोफाईल लॉक करून ठेवतात. जर महिलेचा अश्लील फोटो टाकलेला असेल तर हे लोक तो अकाउंट पब्लिक वरती ठेवतात. भरपूर फॉलोवर्स वाढवतात. फेक अकाउंट खोलणाऱ्या स्त्री-पुरुषांना एकच सांगते इथे तुम्ही अनेक लोकांना फसवू शकता. सोशल मिडीयावरती कोणाला पण तुम्ही उल्लू बनवू शकता. पण त्या ईश्वराला तुम्ही फसवू शकत नाही. असे फेक अकाउंट खोलून कोणाची अब्रू वेशीवर टांगणे योग्य नाही. एखाद्याचा फोटो घेऊन त्याच्यावर अश्लील चाळे करायचे आणि त्याला बे इज्जत करायची हे एखाद्या गुन्हेगाराचेच काम असतं, चांगल्या लोकांचे काम नसतं. ती महिला तुमची मक्तेदारी नाही किंवा ती महिला तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. तिचे फोटो अश्लील करून फेसबुक वरती टाकायचे.एखाद्या संस्कारीत महिलेचा फोटो फेसबुक वरती टाकायचं आणि त्याच्यातून लाईक्स कमेंट्स पैसा मिळवायचा तर ते गुन्हा आहे.

एखाद्या संस्कारी महिलेला चारचौघांमध्ये बे इज्जत करणं तिची अब्रूवेशीवर टांगण हे खूप मोठे पाप आहे आणि ह्याची शिक्षा आज ना उद्या फेक अकाउंट वाल्यांना नक्कीच मिळणार. किती पुरुषांकडून तुम्ही पैसे उकळलेले असणार ते पैसे त्यांनी कदाचित मेहनतीतून मिळवलेले असतील ते पैसे तुम्ही तुमच्या खात्यात जमा करून ठेवता. म्हणजे तुम्ही किती मोठे गुन्हेगार आहात. अशांना कधी ना कधी ईश्वर शिक्षा देणार. पण परत त्यांना मनुष्य जन्म मिळणार नाही, प्राणी योनीत त्यांना नक्की जन्म मिळणार. दुसऱ्यांच्या अब्रू वेशीवर टांगणे, फसवणूक करणे, दुसऱ्यांना उल्लू बनवून त्यांच्या आयुष्याची वाट लावू नये हे मुळात पापच आहे आणि या पापाची शिक्षा तुम्हाला कधी ना कधीतरी मिळणारच हे लक्षात घ्या.

या सोशल मिडीया वरती प्रत्येक स्त्री-पुरुषांनी आपली स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आपला पाय कुठे घसरणार नाही. आपण कोणाच्या प्रेमात पडणार नाही आणि ते प्रेमातून आपलं जीवन आपल्या संसार उध्वस्त होणार नाही. आपली कमावलेली संपत्ती एका क्षणात नष्ट होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. हा सर्व मोहाचा बाजार आहे. या मोहाच्या बाजारात तुम्ही कोणीही बळी पडू नका. सावधान रहा गुन्हेगाराला ओळखा त्या गुन्हेगाराला बळी पडू नका. अशा बनावटी खात्यांना चाप लावण्यासाठी ‘ब्लॉक एन्ड रिपोर्ट’ मोहिम आजपासून सुरू करा. महिनाभरात याचा परिणाम दिसून येईल असा मला तरी विश्वास वाटतो.

तृप्ती पाटील
मालाड (ईस्ट) मुंबई
========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे