Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आगरी समाज संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ ला रक्तदान शिबिराचे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

आगरी समाज संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ ला रक्तदान शिबिराचे आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग (दि ११ डिसे.): रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक जाणिवेतून जिल्हा रक्तपेढी अलिबाग यांच्या माध्यमातून आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्या पुढाकाराने आणि कच्छ युवक संघ व लायन्स क्लब अलिबाग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत कच्छी भवन, श्रीबाग – अलिबाग येथे करण्यात आले आहे.

सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये अपघात, शस्त्रक्रिया, गर्भवती माता, थॅलेसेमिया व कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवरील उपचारासाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. मात्र, रक्तदात्यांचा अपुरा प्रतिसाद व वाढती मागणी यामुळे अनेक वेळा रुग्णांना रक्त मिळण्यात अडचणी येतात. हाच तुटवडा भरून काढण्यासाठी आगरी समाज संस्थेतर्फे ही सामाजिक जबाबदारी अत्यंत गांभीर्याने स्वीकारून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

“Donate Blood – Save Life” या संदेशास अनुसरून प्रत्येक निरोगी नागरिकाने रक्तदान करून मानवतेचे श्रेष्ठ कार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदानामुळे कोणताही शारीरिक अपाय होत नसून उलट रक्तदानामुळे शरीरात नव्या रक्तनिर्मितीस चालना मिळते व इतरांचे प्राण वाचवण्याचे पुण्यकार्य आपल्या हातून घडते, असा संदेशही या शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

या रक्तदान शिबिरासाठी कच्छी युवक संघ, लायन्स क्लब अलिबाग तसेच अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन यांचे विशेष सहकार्य लाभणार असून, शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्व स्वयंसेवक मेहनत घेत आहेत. रक्तदात्यांसाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी, स्वच्छता तसेच सुरक्षिततेची संपूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात येणार असून, रक्तदात्यांना संपूर्ण सुरक्षित वातावरणात रक्तदान करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

या सामाजिक उपक्रमास यशस्वी करण्यासाठी अलिबागमधील युवक-युवती, महिला-भगिनी तसेच सर्व सामाजिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे कळकळीचे आवाहन आगरी समाज संस्था, अलिबाग यांच्यावतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क पुढील नंबरवर संपर्क करावा
श्री निलेश पाटील ८३८०००६०६३, केतन शहा ९७६२४०१४००, महेश कवळे ९४२११७१४८०

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे