अहमदनगरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
आधार होऊ या; बी.आर.पतंगे
0
4
8
2
9
0
आधार होऊ या
चला आधार होऊ या त्यांचा
गेले सोडून आप्तेष्ट ज्यांचे
कोरोना संग्रामात!!!
चला आधार होऊ या
त्या अनाथांचा
नसे कुणी वाली जयांचा!!!
चला आधार होऊ या त्यांचा
दुष्काळात ज्यांचे पीक करपले
ना राहिले पीक शेतात
ना कुटुंबाला दाणा!!!
चला आधार होऊ या त्यांचा
सीमेवर जे शहीद झाले
कपाळीचे कुंकू गेले
कुटुंबावर आभाळ कोसळले!!!
चला आधार होऊ या त्यांचा
पुरात ज्यांचे घरदार गेले
न राहिली पायी जमीन
न डोईवर आसरा!!!
बी.आर.पतंगे
जि.अहिल्यानगर
===========
0
4
8
2
9
0



