Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानांदेडसाहित्यगंध

आंदोलन

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0 4 8 2 9 3

आंदोलन

लेखणीने बाबासाहेबांच्या
दिले हक्क आणि अधिकार
अन्यायाविरुद्ध लढण्याचा
करावा एकजुटीने प्रतिकार

का म्हणून हिरावून घ्यावे
स्वातंत्र्य जनता जनार्दनांचे
आंदोलन करुन तोडतील
जुलमी पाश गुलामगिरींचे

हे बंद मोर्चे संप नि हडताल
मुस्कटदाबी विरुद्धचा एल्गार
मागती जर सनदशीर मार्गाने
शासन दरबारी व्हावा विचार

लोकशाहीच्या वल्गना फुकाच्या
बेबंदशाहीने स्तोम माजवले
आंदोलनाच्या या माध्यमातून
भलेभलेही वठणीवरच आले

आंदोलन हा हक्क जरी आपला
जबाबदारीचेही भान असावे
अवलंबावा लोकशाही मार्ग
हिंसक वृत्तीचे वळण नसावे

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे