Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रविदर्भ

भंडारा जि.प. मध्ये समुपदेशन कार्यशाळा २४ जून रोजी

आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना

0 4 8 2 9 0

भंडारा जिं.प. मध्ये समुपदेशन कार्यशाळा २४ जून रोजी

आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना

भंडारा: प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश डिसेंबर २०२३ रोजी ग्राम विकास मंत्रालयातर्फे सर्व मु का अ यांना तसेच शिक्षकांना इ मेल द्वारे प्राप्त झाले होते. परंतु कार्यमुक्त करण्याचे सर्व अधिकार मु का अ यांच्या अधिनस्त स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पत्र काढण्यात आले होते. या अनुषंगाने संपूर्ण राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ हा कार्यक्रम राबविण्यात आल्याने, आदर्श आचारसंहिता असल्याने शिक्षकांच्या कार्यमुक्ती संदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता.

काही जिल्हा परिषदेने आचारसंहिता लागण्यापूर्वी शिक्षकांच्या बदलीची प्रक्रीया राबवली. भंडारा जि.प. मध्ये
एकूण ९७ शिक्षक आंतरजिल्हा बदलीने रूजू होणार होते. त्यापैकी २१ जणांना (दि.१४ मार्च) २०२४ रोजी झालेल्या समुपदेशन प्रक्रीयेंतर्गत पदस्थापना देण्यात आली होती.

लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडल्यानंतर आदर्श आचारसंहिता संपली असून इतर जि प नी शिक्षकांना कार्यमुक्त केले असून उर्वरित ७६ पैकी ५० शिक्षक जि प भंडारा येथे रूजू झालेले आहेत. या ५० शिक्षकांना पदस्थापना देण्यासंदर्भात आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांची समुपदेशन कार्यशाळा, दि. २४ जून २०२४, सोमवारी दुपारी ०१-०० वा. जि प सभागृह, भंडारा येथे आयोजित करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाच्या वतीने तसे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी (प्र) मा. रवींद्र सोनटक्के यांनी आज प्रसिद्धीसाठी पाठवले आहे.

आंतरजिल्हा बदलीने भंडारा जि प येथे रूजू झालेल्या शिक्षकांनी दि २४ जून रोजी दुपारी १.०० वाजता समुपदेशन कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे