बुटीबोरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्तनवादी महारँलीचे आयोजन
अखिल रोडे प्रतिनिधी

बुटीबोरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्तनवादी महारँलीचे आयोजन
महाकारुणिक बहुउद्देशीय महिला संघटन समितीचा पुढाकार
अखिल रोडे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ बुटीबोरी :(दि १५ एप्रिल) “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश घेऊन महाकारुणिक बहुउद्देशीय महिला संघटन समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिवर्तनवादी महारँलीचे आयोजन करण्यात आले. या महारेलीमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला दिलेला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, प्रज्ञा, शील, करुणा आणि लोकशाही मजबूत करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.
बुटीबोरी येथील लाकूडकर ले-आऊट परिसरातून महारेलीची सुरुवात करण्यात आली. तथागत गार्डन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून संविधान, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाच्या मूल्यांशी बांधिलकी व्यक्त केली.
महारेली दरम्यान मराठा ले-आऊट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केक कापून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसरात “जय भीम”, “संविधान जपा” तसेच “समता, बंधुता आणि न्याय”च्या घोषणा देत वातावरण भारावून गेले होते.
या परिवर्तनवादी महारेलीला बोथली ग्रामपंचायतचे उपसरपंच अरुण वानखेडे तसेच अनिल भाऊ ठाकरे यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
महारेलीमधून उपस्थितांना संविधानाच्या पावित्र्याचे जतन करण्याचे, सामाजिक ऐक्य वाढविण्याचे आणि अन्यायाविरुद्ध संघटितपणे उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या संदेशासोबतच “लोकशाही मजबूत करा” हा विचारही प्रभावीपणे मांडण्यात आला.
या कार्यक्रमात महाकारुणिक बहुउद्देशीय महिला संघटन समितीच्या पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महारेलीमुळे बुटीबोरी परिसरात परिवर्तनवादी विचारांची जागृती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. अध्यक्ष वैशाली चव्हाण, उपाध्यक्ष माया मेश्राम, सचिव स्वाती पाटील ,सहसचिव लक्ष्मी नारनवरे, कोषाध्यक्ष उज्वला थूल, सदस्य गण मंदा वंजारी शकुंतला शंभरकर रीता पिल्लेवान दीक्षा पिल्लेवान नीलिमा ताम गाडगे मध्ये कुसुम थूल कल्पना लाउत्रे दर्शनाला लावतरे अश्विनीथून सुचिता भगत गीतामेंढे मनीषा मेंढे मनीषा वाहने करुणागणवीर स्नेहा भस्मे पौर्णिमा बनसोड विजया खोब्रागडे सविता भाले सिंधू भगत प्रिया शेंद्रे आदी उपस्थित होते.



