0
4
8
2
9
3
हिशोब
आईची माया बेहिशेबी
मोजलीच नाही कधी
झुळझुळ तिच्या प्रेमाची
वाहतच होती नदी
नऊ महिने सांभाळून
जपलं तिनं पोटात..
बाहेरच्या जगात आल्यावर
होतो तिच्या हृदयात..
जमा केला नेहमीच
जीवनात माझ्या आनंद
खर्चुनी क्षण स्वतःचे
नाही पाहिला ताळेबंद..
काय केलं मी आईसाठी
याचा हिशोब जेव्हा केला
बोटावर मोजण्यातच
ताळेबंद तो संपला..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर पुणे
0
4
8
2
9
3



