0
4
8
2
9
0
बालतरू
बालतरू रोपण अंमलबजावणी करू
चला आता तरी सारे वृक्षारोपण करू
समतोल बिघडलेला आहे निसर्गाचा
ऱ्हास होत चालला आहे जतन करू
वाहतुकीच्या नावे रस्ते केले मोठाले
रस्त्याच्या कडेने आता सावली करू
उद्या होईल वटवृक्ष,बालतरू आजचा
लेकरासम पालनपोषण,संगोपन करू
मिळेल ऑक्सीजन ,सुधारेल जिवन
आहे जगण्या गरजेचे ते निर्माण करू
तीव्र उष्णता, तापमाना बसेल आळा
शितल छायेत विसाव्याची कास करू
किमया वृक्षराजीची आहेच लयभारी
बहुगुणी वनौषधी खजाना तयार करू
मिळतील रोपवाटिकेतून हवे ते रोपटे
रोपट्याचा महावृक्ष,कार्य महान करू
काढूयात वृक्षदिंडी होईल जनजागृती
शाळा मधून सुरुवात उपक्रमाची करू
बी एस गायकवाड
पालम, परभणी
0
4
8
2
9
0



