कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
अंकगीत; मीनाक्षी काटकर
0
4
8
2
9
0
अंकगीत
सत्तर एक एकाहत्तर
गाव माझे दत्तापूर
सत्तर दोन बाहत्तर
आजी राहते सिंगापूर
सत्तर तीन त्र्याहत्तर
ताई जाते शहापूर
सत्तर चार चौ-याहत्तर
बाबा गेले पंढरपूर
सत्तर पाच पंचाहत्तर
जायला लागले दिवस फार
सत्तर सहा शहात्तर
सोबत नेले सुगंधी अत्तर
सत्तर सात सत्त्याहत्तर
प्रवासाला त्यांच्या हेलीकॕप्टर
सत्तर आठ अठ्ठ्याहत्तर
थकल्यामुळे आली चक्कर
सत्तर नऊ एकोणऐंशी
दवाखान्यात सोबत गेला बंशी
आठ दशक होतात ऐंशी
दर्शन करून आले खुशी खुशी
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=========
0
4
8
2
9
0



