0
4
8
2
9
7
तू ठेवा आठवांचा
तुझ्या संगती मी
माझ्या संगती तू
बहर चैतन्याचा…
शोधतो तू चारा
भाव आशेचा
निवारा अंशकालाचा…
पाहता तू चौफेर
खेळ नजरेचा
उगा मोह मनाचा…
संशय तुझ्या मनी
सावध तू तत्क्षणी
किनारा नजरेचा…
धाडस अनाठाई
चलबिचलतेची ग्वाही
घात न विश्वासाचा…
अल्पसमयी सहवास
मजसाठी खास
आनंद जीवनाचा…
पसरता पंख तू
उदासली छटा
हा घात मनावरचा…
जाताच तू संपली
ओढ मनीची
हा खेळ क्षमभराचा…
अंतरात्म्यात रुतली
मैत्री क्षणभराची
तू ठेवा आठवांचा….
कपोता,तू ठेवा आठवांचा….!!
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
0
4
8
2
9
7



