0
4
8
2
9
4
मन फुलपाखरू
क्षण निवांत
अवचित आला
स्पर्श मखमली
हृदयास झाला
अडखळले पाऊल
नजर वळली
हळूवार भावनांची
चाहूल कळली
क्षणभर नजर
कैद मनात
रंग हातावर
आनंद चैतन्यात
अलगद उडता
रंग सुटले
ह्रदय क्षणात
तिथेच गुंतले
हास्य तनूवर
शब्द गुंजले
मन फुलपाखरू
क्षणात बनले
शर्मिला देशमुख -घुमरे
ता.केज जि.बीड
0
4
8
2
9
4



