Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

‘चटणीभाकर’ कुणाच्या आवडीची, तर कुणासाठी पोटभरणी; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 9 3

चटणीभाकर’ कुणाच्या आवडीची, तर कुणासाठी पोटभरणी; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा” अशी एक म्हण प्रचलित आहे. सणकून भूक असेल तर पोटाला चटणी भाकरीही चालते आणि सपाटून झोप असेल, तर पाठीला दगडधोंडेही चालतात. भूक आणि झोप या दोन गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत.. ते नैसर्गिकच असावे लागते. कधी कुणाला परिस्थितीने ग्रासलेले असते. तर कधी कुणाला आधी व्याधीने त्रासलेले असते. पन्नास किलो वजनाची धान्याची गोणी जो स्वतः उचलू शकतो तो विकत घेऊ शकत नाही आणि जो विकत घेऊ शकतो तो उचलू शकत नाही. जो वाट्टेल ते पचवू शकतो त्याला हवे ते मिळू शकत नाही.. आणि ज्याला हवे ते हवे तितके मिळू शकते तो ते पचवू शकत नाही. असा विरोधाभास हेच जीवन आहे.

कधी चटणी भाकरी सोबत कांदा, कधी ठेचा झुणका..वर तेलाचा थेंब, हा गोरगरीबांचा नित्याचा आहार. आणि शेत शिवारात काबाडकष्ट करत दिवसभराचा विहार. आज हाच आहार कुणी अमाप पैसे मोजून हौसेने खातात तर कुणाला मजबुरीने खावा लागतो. पौष्टिकतेचे महत्व आजकाल लोकांना कळून चुकलंय.. म्हणून तर अर्थिक ओढाताण आणि गरिबीमुळे साधा आहार घेणारे शेत शिवारातील लोक आजही सुदृढ आहेत. याउलट अमाप पैसेवाल्यांनी चायनिज, नुडल्स, जंक फूड, आणि तत्सम कधीतरी बनवलेले चटक मटक मसालेदार पॅकिंगचे खाद्यपदार्थ खाऊन शरीराला अनेक रोगांचे घर करून ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर आज चित्रचारोळी स्पर्धेसाठी आलेले ‘चटणीभाकरी व कांदा’ असणारे चित्र खूप काही सांगून जाते.

‘कांदा नि भाकर खाऊद्या की रं,
मला बी जत्रंला येऊ द्या की..!’

हे ‘दादा कोंडके’वर चित्रित केलेले गीत सहजच नजरेसमोर तरळले. अगदी कितीही घाईची वेळ असली, तरी घरात सहजपणे उपलब्ध होणारी चटणी भाकर.. तशी ग्रामीण भागातील लोकांसाठी इन्स्टंट फूडच… शरीराला काटकपणाचा साज देणारे हे जेवण काहीजणांना खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. दहा वर्षापूर्वी माझ्या शाळेत असणारा एक विद्यार्थी यानिमित्ताने आठवला. तो दररोज चटणी आणि भाकरीच डब्यात घेऊन यायचा. पाच-सहा वेळा मी हे पाहिल्यानंतर त्याला विचारले तर सगळीच मुले एकदम म्हणाली, ‘मॅडम त्याला दुपारच्या जेवणात चटणी भाकरच खूप आवडते. त्यामुळे तो कधीच भाजी आणत नाही.’ आहे की नाही ही चटणीभाकरीची कमाल..! कुणासाठी अत्यंत आवडीची तर कुणासाठी पोटभरणी.

हीच ‘पोटभरणी’ आज मराठीचे शिलेदारांनी शब्दरूपातून व्यक्त केली. ‘कांदा, भाकर, चटणी चवीला, तर चवीला पण शब्दांनाही घालून गेली मोहिनी’. वैविध्यपूर्ण लेखणीसाठी सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

सौ स्वाती मराडे, इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/सहसंपादक
©मराठीचे शिलेदार समूह

4/5 - (4 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे