0
4
8
2
9
0
क्षणभंगूर
क्षणभंगूर हे जीवन
नाही भरवसा घडीचा
आवळेल कधीही फास
गळ्याभोवती मृत्युचा
घडतात विपरित घटना
जाणिव नसते मनाला
होत्याचे नव्हते क्षणात
कळेना हा खेळ कसला
जन्म आणि मृत्यु दोन्ही
नाही अपुल्या हातात
कधी कधी मानवी चुका
ओढतात मृत्युच्या पाशात
धन,संपत्ती,नातीगोती
राहतात सर्व जागेवर
सर्व सोडून जातो आत्मा
अनंताच्या सफरीवर
अती लोभ नाही कामाचा
प्रगतीच्या नावे अधोगती
हर्षाचा शेवट क्षणार्धात
होतो कधीही आपत्तीत
श्रीमती सुलोचना लडवे
जि.अमरावती
========
0
4
8
2
9
0



