बैलपोळ्याच्या आठवणी
श्रीमती सिमादेवी बेडसे ग्रामपंचायत अधिकारी चाळीसगाव

बैलपोळ्याच्या आठवणी
आठवतो अजून तो पोळ्याचा दिवस,
अंगणात सडा, दाराशी तोरण खास…
मातीच्या सुगंधाने भरलेलं गाव,
बैलांच्या गळ्यात वाजायचा घुंगरांचा ठाव…
पहाटेपासून लगबग घराघरांत,
बैल न्हायचे प्रेमाने स्वच्छ पाण्यात…
शिंगांना रंग, अंगावर नक्षी,
गळ्यात माळ अन् कपाळी कुंकवाची रेषी…
आईच्या हातची पुरणपोळी गोड,
वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद अपार मोठा…
बैलांच्या पायांवरती ओवाळणीची थाळी,
त्यांच्याविना शेतीची कहाणीच अधुरी सारी…
दुपार झाली की पोळ्याची मिरवणूक,
लेझीमच्या तालावर गावाची धूमधडाकूक…
लहानग्यांच्या डोळ्यांत आनंद भारी,
सजलेले बैल दिसताच खुलायची स्वारी…
नव्हता मोबाईल,नव्हती सेल्फीची घाई,
सणातच भेटायची माणसं आपली परत एकदाई…
थोडक्यात साजरा,पण मनापासून होता,
पोळा म्हणजे गावाचा सगळ्यात सुंदर सोहळा होता…
आजही आठवणींच्या वाटेवरून जाताना,
तोच घुंगरांचा नाद ऐकू येतो मनाला…
काळ बदलला,बदलली गावाची रीत,
पण बैलपोळ्याची आठवण अजूनही तितकीच प्रीत…
मातीशी नातं, बैलांशी माया,
याच संस्कारांनी गावची ओळख घडवाया…
पोळा फक्त सण नव्हता, भावना होती,
शेतकऱ्याच्या कष्टांची ती प्रेमळ कहाणी होती…
श्रीमती सिमादेवी बेडसे
ग्रामपंचायत अधिकारी चाळीसगाव



