0
4
8
2
8
6
कानटोपी
मऊ मऊ कापसाची
बनवली छोटी टोपी
सुंदर कान त्यावरती
नाव तिचे कानटोपी
टोपी घालता बाळ तो
हसू लागला अफाट
गोंडा शोधण्या आईने
खोलले लाकडी कपाट
टोपी शोभे रंगीं बेरंगी
जसा कोंबड्याचा तुरा
वीण सजे टोपीवरती
जसा सछिद्र मुरमुरा
कान टोपी करते रक्षा
शोभे डोईवर ती छान
करत नसते भेदभाव
मोठा असो की लहान
डोके छोटे चेंडूसारखे
ओठ ते नाजूक लाल
केस दिसे काळे काळे
गुबले छोटेसे दोन गाल
भोसले तानाजी निवृत्तीराव
ता.देगलूर,जि.नांदेड
0
4
8
2
8
6



