
तुमचे प्रेम असेच आम्हा शिलेदारांवर राहो, पुढेही ते भरभरून मिळत राहो; गजवंती विघ्ने
मराठीचे शिलेदार समूहाचे आभार
प्रिय,बालकवी समूह, आज माझ्या ‘धबधबा ‘या बालकाव्यरचनेला सर्वोत्कृष्ट बाल काव्यरचनेचा सन्मान मिळाला, त्याबद्दल मराठी शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर, सविताताई ठाकरे, पल्लवी ताई पाटील, तसेच बाल काव्य रचनेच्या परीक्षक शर्मिला देशमुख या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.
वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे सांभाळून घेणारे, काही चुकलं तर सांगून मोकळे होणारे, परत सांभाळणारे आदरणीय राहुल दादा, सर्वांच्या समोर न येता अविरत काम करणाऱ्या पल्लवी ताई, सवित्या(सूर्या) प्रमाणे समभाव ठेवून सर्व शिलेदारांवर भरभरून प्रेम करणारी सविता, नावाप्रमाणे निरागस, शर्मिली दिसणारी शर्मिला, साधी ,सोज्वळ स्वाती, समंजस वृंदाताई, विष्णू सर, प्रशांत सर, प्रतिमा, तारका ताई व इतर ही ज्यांची नावं मला माहित नाही अशी सगळी मंडळी जी समूहासाठी काम करून समूहाला वेगळ्या उंचीवर नेतात, खरंच यांचे श्रम आणि काम शब्दातीत आहे.
तुमचे प्रेम असेच आम्हा शिलेदारांवर राहो, पुढेही ते भरभरून मिळत राहो या मंगल कामनेसह पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद व आभार. ज्या ताई, दादांनी माझ्यावर अभिनंदनचा वर्षाव केला त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद तुमच्या प्रेरणा दायी व प्रेमळ शुभेच्छांचा मी सहर्ष स्वीकार करते. धन्यवाद.
गजवंती विघ्ने
बडनेरा, जि अमरावती
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



