0
4
8
2
8
6
झुळझुळ वारा
शिशिर ऋतू झाला सुरू
वाहू लागला झुळझुळ वारा
पानगळ आता झाली सुरू
बदलू लागला चेहरा मोहरा
आकाशाची कांती बदलली
दिसतोय रूप नवा नवा
एकामागून एक चालले
काळ्या पांढर्या ढगांचा कारवा
सौंदर्यवान ती वृक्षवेली
ओकडे बोकडे होऊ लागली
सौंदर्यांत पडली. खिन्नता
निसर्गाच्या सौंदर्यात दिसे भिन्नता
झुळझुळ वारा वाहत असता
खळखळ वाजती पाने
हिरवाकंच सौंदर्याचा करून त्याग
सहन करती दुःख आनंदाने
झुळझुळ वारा सांगून जातो
होणार तुमची पुढे पानगळ
हा त्याग जिवनाचा मोठा
पुढे फुलणार आयुष्यात कमळ
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
0
4
8
2
8
6



