Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणे

‘डहाळी’ चे संपादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सत्कार

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 7

‘डहाळी’ चे संपादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा सत्कार

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

पुणे : (2 जून ) : डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी अनितकालिकाचे नुकतेच 20व्या वर्षांत पदार्पण झाले. यानिमित्त पश्चिम महाराष्ट्र पोलिस मित्र संघटनेच्या प्रदेश महिला अध्यक्ष वसुधा नाईक, वर्ल्ड क्वीन बीज संस्थेच्या अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे, सुप्रसिध्द गायिका गीतांजली जेधे, महिला सन्मान संस्थेच्या सल्लागार मंदाताई नाईक आणि बाल कवयित्री अजया मुळीक यांनी ‘डहाळी ‘ अनियतकालिकाचे संपादक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा जाहिर सत्कार केला.

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे 1000 हून अधिक साहित्यिक, कलावंत यांना डहाळी अंकाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आणले आहे.डाॅ.घाणेकर हा अंक पूर्णपणे हस्तलिखित स्वरुपात काढतात. प्रत्येक अंकात त्यांची कविता , व्यंगचित्राचा समावेश असतो. हा अंक डाॅ.घाणेकर यांच्या अक्षर रेखटनातून सजलेला असतो. सुविचार, विनोद , कला साहित्य विषयक घडामोडी, विचारवंतांचे संस्कारक्षम लघुलेख, अलककथा, ज्योतिष-अध्यात्म -हस्ताक्षर मनोविश्लेषण विषयक टिपणं, कविता, बालसाहित्य,आवडते गाणे अशा विविधतेतून हा अंक नटलेला असतो.

दिव्यांग आणि वंचित यांच्या साहित्यालाही प्राधान्य दिले जाते. सर्वाधिक काळ आणि विनामूल्य अनियतकालिकाचा उपक्रम.. दिव्यांगांसाठी विशेषांक, एकाच दिवशी विविध विषयांवर डहाळी अंकांची निर्मिती..अशा स्वरुपाचे विश्वविक्रम डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या नावावर आहेत. डहाळी अनियतकालिकाचा 800 वा अंक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली 28जून 2025 रोजी पुण्यात होणा-या 100व्या महिलासज्योतिर्विद अधिवेशनात होणार असल्याचे डाॅ.घाणेकर यांनी सांगितले.

सातत्याने अनेक कलावंत आणि साहित्यिक यांना ही डहाळी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मंदाताई नाईक यांनी सांगितले. डाॅ.घाणेकर यांचे डहाळी अनियतकालिकातील अक्षर रेखाटन, कल्पनाशक्तिचा आविष्कार वाखाणण्यासारखे आहे असे वसुधा नाईक यांनी सांगितले. व्हाटसअपच्या माध्यमातून ही डहाळी सातासमुद्रापल्याडही लोकप्रिय ठरली आहे ही बाब मराठी सारस्वतांना नक्कीच आनंददायी ठरली आहे अशी प्रतिक्रिया मधुकर्णिका सासवडे यांनी दिली.तर डहाळी अंकातील व्यंगचित्र खुप आवडत असल्याचे बालकवयित्री अजयाने सांगितले.या प्रसंगी गीतांजली जेधे यांनी डाॅ.घाणेकर या॔ना कलावंतांच्यावतीने डहाळी अंकाच्या यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अनेक उच्च आदर्शवादी संस्था, ज्येष्ठ विचारवंत , सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक.कलावंत परिवार तसेच वाचक..हितचिंतक यांच्यामुळेच डहाळी सदाबहार रहाते ” या शब्दात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी यशस्वी वाटचालीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे