Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशसाहित्यगंध

जिवलगा

महेश पुरसों काणकोणकर कालापूर बांध, तिसवाडी गोवा

0 4 8 2 8 6

जिवलगा

डोळ्यांत तुझे आठवणींचे धुके दररोज दाटतात,
मनाच्या खोलवर जुन्या जखमा पुन्हा उमटतात.
असतोस जवळ तरीही दूर असल्यासारखं वाटतं,
जिवलगा, तुझ्याविना माझं अस्तित्वच हरवतं.

कधी बोललेले शब्द अजूनही कानात घुमतात,
ओठांवरील हास्य मात्र अश्रूंनी दडपतात.
रात्रभर जागवतो मी रिकाम्या स्वप्नांच्या सोबती,
जिवलगा, तू का गेलास सोडून माझी साथ खरी?

तुझ्या आठवणीत भिजलेला प्रत्येक श्वास,
जपतो मी अजूनही तुझ्या वचनांचा सुवास.
मनात ठरवूनही विसरता येत नाही तुला,
जिवलगा, तुझ्या विरहाने पेटलं अंतःकरण जळता.

आकाशाकडे पाहता वाटतं तू कुठेतरी असेल,
पाखरांच्या किलबिलीतही तुझा आवाज दडलेल.
जीवन माझं थांबलेलं, क्षण थिजलेले सारे,
जिवलगा, परत येशील का भरून आयुष्य रिकामे?

सांग, नातं हे फक्त माझ्यासाठीच होतं का?
की खरंच प्रेम तुझ्या मनात नव्हतं का?
उत्तर न सापडता अश्रूंमध्ये बुडतो पुन्हा,
जिवलगा, तुझ्याशिवाय मी फक्त सावलीसमान उरतो.

महेश पुरसों काणकोणकर
कालापूर बांध, तिसवाडी गोवा
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे