Breaking
ई-पेपरकवितासाहित्यगंध

मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 7

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : निवारा📘*
*🔸मंगळवार : २२/एप्रिल /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*निवारा*

निवारा माझा निवारा
आवडतो खूपच मला
निवांतपणा मिळतो
नाव त्याचे तबेला तबेला

निवारा माझा निवारा
माहिती सांगतो खडानखडा
सुरक्षितता मिळते तेथे
नाव त्याचे खुराडा खुराडा

निवारा माझा निवारा
मोठा किती पहा पहा
अखंड दगडात आहे
नाव त्याचे गुहा गुहा

निवारा माझा निवारा
लागेल त्याला लाकुडफाटा
थंड वाटे तिथे मला
नाव त्याचे गोठा गोठा

निवारा माझा निवारा
आहे कसे नंदनवन
नसे तिथे कशाची ददात
नाव त्याचे सदन

*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*_निवारा*_

माझ्या ग निवाऱ्यात
सुखाचा प्रत्येक क्षण ,
वाट चुकल्या पावलांना
ओढ लावी ते मन

माझ्या ग निवाऱ्यात
विसावलं गोड चांदणं
गरिबीच जरी लेण
ल्याल शहाणपण

माझ्या ग निवाऱ्यात
समाधानाचं नांदणं
समर्पणापरी होतं
देहाचं झिजणं

*श्रीम. शबनम मुबारक काझी, बीड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*निवारा*

पक्षांस प्रश्न पडावा
निवारा कुठे शोधावा
नाही दिसे जागा
सहारा कसा मिळावा ॥१॥

मिळेना आसरा
लागला पळु
तो सैरावैरा
दिलेना कुणा कळु ॥२॥

भेटला वाटेत भैरू
म्हणे पक्षास
तुजसाठी काय करू
मदत हवी कां मित्रास ॥३॥

कुठे बांधावे
घरटं झाडात
नाही गावे
मोकळे ठिकाण रानात ॥४॥

सिमेंटी जंगलात
कुणीना येई कामी
थकलो जीवनात
युक्ती सुचली नामी ॥५॥

रंग बदलले
सारे कसे क्षणात
भैरूला घेतले
तयाने विश्वासात ॥६॥

मनांतील मांडे खात
केला निवारा
भैरूच्या घरात
आनंदी झाला मोहरा ॥७॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*निवारा*

चारशे एकर जंगलावरती
सुरु बुलडोझर चालवायला,
किती झाली क्रूरता तुमची
काय म्हणावं या कृत्याला…

प्राणी मात्रावर दया माया
कसा काय विसर पडलेला,
निवारा आमचा जंगल तेच
निघालेत उध्वस्त करायला…

पहाडासारखा हत्ती आला
आडवा तुम्हाला रोखायला,
त्याच्याही मुखावर तुम्हीच
निष्ठूर होऊन घातला घाला…

तो केविलवाणा चिवचिवाट
मोरांचा ही आक्रोश झाला,
हरिणीचे पाडस बिचाऱ्याचा
अश्रुधार पापणकाठ ओला…

आधुनिकतेच्या नावाखाली
जंगल संपत्तीचं नष्ट कराल,
पक्षी प्राणी भावी पिढीला
चित्रात पाहूनचं मन भराल…

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*निवारा*

अग आई सांग ना मला
काय असतो हा निवारा
गणू सारखा म्हणतो तू तर
पडून राहतो असा शिवारा

बंटी सांगतो असते म्हणे
चिमणीलाही खोपाघर
तुला तर बघतो आम्ही
फिरत असतोच रस्त्यावर

मोनू म्हणतो कुठे आहे
बघू दे आम्हाला तुझं घर
कधीतरी खेळू या सर्वच
तुझ्या घराच्या गच्चीवर

सांग ना आई घर म्हणजेच
असतो का आपला निवारा
चार भिंतींवर संरक्षणाचा
भक्कम छताचा तो सहारा

आपण तर फिरत असतो
ह्या गावी कधी त्या गावी
ऊसतोडणी करतच का
जीवन जगणार असे भावी

आपल्याला कधी मिळणार
हक्काचे छत्र डोक्यावरती
निवारा असावा माझाही,मग
दाखवू त्यांना जे निंदा करती

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*निवारा*

आई बघ ना ग
खोपा चिमणीचा
तयार करताना
वापर करते कशाचा?

पावसाळ्याची सोय
करतात ते राहण्याची
निवारा हा विणलेला
करतो सुरक्षा त्यांची

जसे आपले घर आहे
निवा-यासाठी आपल्याला
प्रत्येक पशुपक्षासाठी
असतो निवारा राहण्याला

पक्षांचे असतात खोपे
गायबैलासाठी गोठा
घोड्यासाठी तबेला
जंगली प्राण्यांची गुफा

पक्षी काडी काडी जमवून
विणतात अपुला खोपा
देऊन अंडी खोप्यात
पिल्लांची होते सुरक्षा

मातीचा कण कण जमवून
मुंग्या बनवतात वारूळ
विवीध प्रकारचे निवारे
पाहून मन होई गुढ

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी दि २५/०४/२०२५ पर्यंत करावी*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*निवारा*

ऊन वारा पाण्यापासून
व्हावे जिवाचे संरक्षण
शांत चित्त लागावी झोप
करतात पाल्लांचे संगोपण

घरटा तयार करून
घेतात त्याचा आसरा
गवत काळीचा असते बनलेला
तोच तर असतो निवारा

तोच त्यांचा असतो
सरक्षा कवच ठिकाण
पिल्यांना ठेवून एकटे
होतात ते रममान

निवारा हा सुरक्षीत ठिकाण
तोच त्यांचा असतो मकान
जिवन त्यांचा असतो अधूर
असते त्याच्यात आपलेपण

जगत असतात मोकळेपणाने
राहत असतात आनंदानें
निसर्ग त्यांचा सगा सोबती
टळत असते त्यांची आपत्ती

मुक्तपणे करतात संचार
निवारा चा घेतात आधार
जगतात कसे त्यांनाच माहीत
एकमेकांचा करतात हीत

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*निवारा*

माणसाचा निवारा झोपडी
कौलारु डोलदार आवास
टुमदार खोपडी शानदार निवास
सिमेंटचा बंगला याचे नाव घर ।।१।।

चिमणीचा गवताचा मऊमऊ सोफा
गालिचा जसा, याचे नाव घरटे
कबुतराचे उंचावर असते खुराडे
सुगरणीचा झुला टांगलेला तो खोपा।।२।।

गायी वासरुचा निवारा गोठा
उंदिरमामा मुंगूसमामा बीळात मोठा
घोडा शिंगरु चा पहा तबेला
हत्तीचा अंबरखाना,वाघ सिंहाची जंगलात गुहा।।३।।

इवलीशी मुंगीचा वारुळाचा बंगला
आयत्या बिळात बसतो म्हणे नागोबा
कोठारीचे मऊ मातीचे थंडगार घर
कोळी किटक विणतो जाळीदार
षटकोनी निवारा ।।४।।

मधमाशीचा निवारा मधाचं पोळं
फुला फुलातला मकरंद त्यात भरला
सुतार पक्षी टकटक करतो
झाडाच्या खोडात निवारा बनवतो।।५।।

पोपटाची हिरवी हिरवी ढोली
पेरुच्या झाडावर करतो मिठुमिठू
कधी कधी डाळिंबाचे दाणे खातो
हिरव्या पिंजरात कैद होऊन।।६।।

*श्री गणेश नरोत्तम पाटील*
*ता शहादा जि नंदूरबार*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*निवारा*

निळ्या निळ्या आकाशात
लुकलुक चांदण्याची
पाहता त्यांना आठवण येई
मला माझ्या मामाची

उंच उंच डोंगरावर
हिरवी हिरवी झाडे
सूर्य उगवतो तेथून
एक दिवस नसे खाडे

काळ्या काळ्या ढगातून
येते पावसाची सर
थकत नाही संपत नाही
पडत राहते दिवसभर

गरम गरम उन्हात
पाण्यासाठी तग मग
चिऊताई येते दारी
तिला पाणी देऊन बघ

हवा असतो सर्वांना
परिसर आपला न्यारा
आईच्या कुशीमध्ये
माझा प्रेमळ निवारा

*शर्मिला देशमुख -घुमरे , बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
*निवारा*

कटाकट,फटाफट तू
तोडली माणसा लाकडे….
आम्ही कुठे रहावे आता
कोणा घालावे साकडे….?

निवारा आमचा तू
का केलास नष्ट…
असा कारे वागलास
तू आमच्याशी दुष्ट…२

आम्ही सगळे प्राणी,पक्षी
माणसा तुझेच ना रे दोस्त…
नकोस मोडू आमचा निवारा
राहू आपण सगळेजण मस्त…३

झाडांमुळेच तर सगळीकडे
भरपूर पडतो ना रे पाऊस…
त्यामुळेच तर माणसा तुझी
सगळी पूर्ण होते हौस….४

आमचा निवारा मोडल्याने
सगळे प्राणी गावात शिरले…
मग तुलाच फाडून खाताना
तुझे डोके का फिरले….५

माणसा तुला पुन्हा एकदा सांगतो
झाडे लावून आमचा निवारा तयार कर…
मग आम्हीही नाही शिरणार गावात
मग तुलाही नसेल कोणाची डर…६

तुमच्या आमच्या सहकार्याने
नवीन तयार करून निवारा…
झाडे,जंगले,वने निर्माण करून
आपणच फुलवूया आपल्या शिवारा…७

नको झाडे तोडू
नको डोंगर फोडू….
यातून आपण सगळे
काहीतरी मार्ग काढू….८

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📚🔰➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे