आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरभणीमराठवाडासाहित्यगंध
शेतकी मित्र
मायादेवी गायकवाड ठोकळ मानवत परभणी
0
4
8
2
8
4
शेतकी मित्र
माझा, शेतकी मित्र आहे
पोशिंदा सर्व जगाचा,
बैल सखा,राब राब राबे,
पोळा सण, त्याच्या सन्मानाचा.
निःस्वार्थ सेवा करतो धन्याची
पर्वा,नाही ऊन वारा पावसाची,
सदैव,चाकरी करतो वर्षानुवर्षे
किती गावी थोरवी त्याची.
उपकार तरी, किती मानावे
इमानदार प्राणी आहे तो,
सुखापेक्षा दुःखात साथ देई
झीजतो राबतो, हीत चिंतीतो.
आजच्या या, आधुनिक युगात
मित्रांची व्याख्या आहे,धोकेबाज,
विश्वास तरी, कोणावर ठेवू?
झालेत सारेच कावेबाज.
बदलले कोणी कितींही
शेतकी मित्र,सदैव साथ देई,
येवो कितीही,बिकट परिस्थिती
संकटात हक्काचा आधार होई.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
0
4
8
2
8
4



