
0
5
1
7
8
7
मायबोली
ओठी येता मायबोली
कळे ह्रदयाची खोली..
कित्येक सुख – दुःख
तिच्या ठायी विसावली
खूप खूप कष्टातून
वाट तुडवून आली..
आणि लेकराला तिच्या
मांडी बसायला दिली
जना ,तुका,ज्ञाना रत्ने
पोटी तुझ्या उपजली
ओवी, अभंग नि गाणी
मग यातून जन्माली…
दिले जगण्याचे भान
थोर असो वा ते सान
द्रोही असो वा विद्रोही
सारे अंगणी खेळली
तुझी मायेची पाखर
आणि अक्षर सानुली
उच्चारता एकेक शब्द
थरारली देहबोली….
शारदा जोशी-कुलकर्णी
ता. जिल्हा बीड
0
5
1
7
8
7



