Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

देवाचं काही अडत नाही

कुसुमलता दिलीप वाकडे उमरेड रोड, नागपूर

0 5 5 8 5 8

देवाचं काही अडत नाही

आस्तिक नास्तिक या वादात
मी कधीच पडत नाही
त्याला माना किंवा नको
देवाचं काहीच अडत नाही

तो राबणाऱ्या बळीराजात आहे
तो लढणाऱ्या सैनिकात आहे
सेवा करणाऱ्या नर्समध्ये आहे
शिकविणाऱ्या शिक्षकांत आहे

देगा हरी पंलगावरी म्हटल्याने
देव कधीच पावत नाही
मेहनत कष्ट केल्याशिवाय
दाम कधीच मिळत नाही

देवाजवळ नैवेद्य प्रसाद ठेवून
तो कधीच खात नाही
नंतर मात्र गाईला देवून
मूक जनावर तृप्त होऊन जाई

माणुसकी जपून गरजूंना
तुम्हीच पुढे करा मदतीचा हात
वेळप्रसंगी मग येईल तो धावून
तोच माणुसकीची देईल साथ

कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड, नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 8 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे