‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती कृतज्ञभाव; तुमचा फोटो पाठवा जणू हर्षाचा गारवाच; प्रतिमा नंदेश्वर
सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती कृतज्ञभाव; तुमचा फोटो पाठवा जणू हर्षाचा गारवाच; प्रतिमा नंदेश्वर
मनोगत लिहितांना आज मला खूप आनंद होत आहे. कारण खूप दिवसापासून माझी लेखणी थांबली होती. काल थोडी उसंत मिळाली. बालकाव्याचा विषय पण सुंदरच होता. रचना लिहिण्याचा मोह आवरता आला नाही. मी त्वरित रचना लिहिली आणि तीच रचना मुख्य परीक्षकांना भावली. सर्वोत्कृष्टचे पोस्टर समूहात झळकले. आश्चर्यच म्हणावे लागेल..माझ्या शब्दांना योग्य न्याय देत मला मानसन्मान दिला. खरच अक्षरशः मी सुखावून गेले. सर्वप्रथम समूहाचे आधारवड मुख्य प्रशासक,आयोजक आ. राहुल सर,प्रशासक आ. सविताताई व संपूर्ण मुख्य परीक्षक टिमचे मी मनापासून आभार मानते.
आपली रचना समूहातील इतर रचना मधून योग्य पारखून सर्वोत्कृष्ट म्हणून निवडली जाणे. हा एका कवीसाठी किंवा कवयित्रीसाठी खूप मोठा बहुमान असतो. आणि आज हा बहुमान मला मिळाला आहे.आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाची पर्वणीच ठरला आहे. मी शिलेदार समूहाची कायम ऋणी आहे.
‘मुले ही देवा घरची फुले’ असतात, असे आपण म्हणतो. पण कधीकधी या फुलांच्या मनातल्या भावना, त्यांचे अबोल प्रश्न आणि निरागसता शब्दा अभावी’मुकी’ राहून जाते. फुलांच्या याच अव्यक्त भावनांना, त्यांच्या संवेदनशीलतेला कवितेतून वाचा फोडण्यासाठी कदाचित आ.राहुल सरांनी ‘ मुकी फुले’ हा सुंदर विषय बाल कवितेसाठी दिला असावा..मुकी फुले कधीच आपल दु:ख सांगत नाहीत. ऊन, वारा,पाऊस सगळ सोसतात.पण तरीही हसत हसत सुगंध देत राहतात. त्या न बोलणाऱ्या पण खूप काही सांगणाऱ्या फुलांना शब्द देणाचा माझा हा छोटासा प्रयत्न होता.
छोट्या मुलांप्रमाणेच निष्पाप व निरागस ही रंगबिरंगी फुले जेव्हा दारात फुलतात ना, घराच सौंदर्य तर वाढवतात. त्याचबरोबर सारा परिसर पण सुगंधीत करतात. त्या सुगंधाने मन अगदी प्रसन्न वाटते.’मुकी फुले’ किती परोपकारी असतात. त्या नाजूक फुलांना न तोडता त्या फुलझाडांची निगा राखावी हेच मी कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला.परीक्षक मंडळीनी माझ्या शब्दाची दखल घेऊन माझा सन्मान केला मी धन्य झाले.
माझ्या शब्दांना पंख दिले साहित्य जगात कवियत्री म्हणून ओळख निर्माण केली असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले शिलेदार समूहाचे आधारवड मुख्य प्रशासक संस्थाप्रमुख साहित्यगंध अंकाचे मुख्य संपादक आ. राहुल सर, निवासी संपादक आ पल्लवी ताई, प्रशासक,कार्यकारी संपादक आ. सविताताई सहप्रशासक आ.वृंदाताई,आ. स्वातीताई, आ. तारकाताई, आ. शर्मिलाताई, आ. विष्णू दादा, आ. लांडगे दादा, आ. उरकुडे सर, आ. संग्राम दादा, आ. प्रशांत दादा सर्व प्रशासकीय टिमचे मनस्वी आभार. माझ्यावर शाब्दिक अभिनंदनाचा वर्षाव करणारे मला लेखणास प्रेरणा देणारे समूहातील प्रिय दादा, ताईंचे मनपूर्वक धन्यवाद.
सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



