Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबई

ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 1 7 5 8

ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: (दि ११) ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोली तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी कामार्ले ग्राम पंचायत सरपंच सौ. अजिता गजने तर प्रमुख वक्त्या कार्लैखिँड येथील प्रयास हा़ँस्पिटलच्या संचालिका डा़ॕ. रेखा म्हात्रे होत्या.

सदर कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वास्तुमध्ये आयोजिला होता. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते गणेश पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख वक्त्या डॉ. रेखा म्हात्रे आपल्या भाषणात म्हणाल्या, “महिला मुळातच सबला असून संकटावर मात करण्याची क्षमता विधात्याने त्यांना दिली आहे. ती कुटुंबाचा आधार असते, पण ती नेहमीच मानसिक तणावाखाली राहते. घरातील सर्वप्रकारची कामे उरकण्यासाठी लौकर उठणे व उशिरा झोपणे , आजाराकडे दुर्लक्ष करणे, सतत कुटुंबाची काळजी करणे यामुळे ती क्षीण होत जाते . पतिराज व्यसनी असेल तर बोलूच नये. समाजातील टोचणी त्या महिलेस नेहमीच सहन करावी लागतात.

क्वचित प्रसंगी मुलीचे वाकडे पाऊल पडले तर शेजारणी त्या महिलेस धीर न देता तिच्या दुःखावर डागण्या देत असतात. त्यामुळे त्या महिलेचे माननसिक संतुलन पूर्णतः बिघडते. ती अधिक चिंताग्रस्त बनते. अशावेळी त्या महिलेस सावरणे व धीर देणे तसेच Coucilling करणे गरजेचे असते. म्हणून कुटुंबाच्या सौख्यासाठी नेहमी आनंदी राहा , समाधानी जगा , काळजीमुक्त राहा , स्वतःच्या प्रकृतीस जपा व वेळीच उपचार घ्या असा सल्ला डा़ँ. रेखा म्हात्रे यांनी समस्त महिलावर्गास दिला. तसेच आपद्ग्रस्त महिलांचे Councilling माझ्या रुग्णालयात मोफत केले जाईल असेही त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ नागरिक संघाचे मुख्य सल्लागार बळवंत वालेकर म्हणाले ” महिला व पुरुष ही संसार रथाची दोन चाके आहेत. पण महिला हे प्रमुख चाक आहे. दोघांच्या समन्वयाने संसार रथ चालत असला तरी महिला निसर्गतः काटक व सहनशील आहेत. पुरुष छंदी -फंदी असला तरी महिलेच्या सहनशीलतेमुळे संसार रथ निर्विघ्नपणे चालत राहतो.

पुरुषांना वठणीवर आणण्याची किमायाही महिलेकडे असते. याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना वालेकर सर म्हणाले ” आज हळदीचे फॕड वाढले आहे. महागाई शिगेला पोचली असतानाही दीडशे – दोनशे किलो मटण शिजविले जाते , हजारो रुपयांचे मद्य रिचविले जात आहे . त्या मटणाची क्वालिटी* कशी आहे, त्याचे दुष्परिणाम काय होतात याचा कोणीही विचार करीत नाही . शिवाय लग्नाच्या शुभ प्रसंगी लाखाची खाक होत असते. म्हणून महिलांनी संघटित हौऊन वहूर* (ता. महाड) येथील महिलांप्रमाणे हळदी*ची प्रथा बंद करण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सल्लागार सुधाकर पाटील, सेक्रेटरी प्रकाश जोमा पटील , श्रीमती मंगला गजने सरपंच सौ. अजिता गजने , सौ. रजनी वालेकर , अंनंत वर्तक यांचीही आपले विचार व्यक्त केले . सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केले.

सदर कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दामोदर ठाकूर , उपाध्यक्ष नंदकुमार पाटील , खजिनदार जनार्दन पाटील , सेक्रेटरी प्रकाश जोमा पाटील , माजी सेक्रेटरी दत्तात्रेय नांदेकर , सल्लागार सुधाकर पाटील कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील , वसंत पाटील, एकनाथ राघो म्हात्रे , तसेच अनंत वर्तक , प्रभाकर हसू पाटील, विष्णू शिर्के , दत्तात्रेय वाघपंजे , सुभाष जाधव , श्रीमती लिलाबाई पाटील , कमलाबाई पाटील , सौ. गुलाब गावंड , मंगला गजने , श्रीमती शुभदा भारती , सौ. रजनी वालेकर , सौ. श्रद्धा वालेकर, श्रीमती शारदा पाटील इ. ८० सदस्य उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे