Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

आगरी समाज संस्थेतर्फे शिक्षक दिनानिमित्त IES शाळा, वरसोलीत शिक्षकांना आर्थिक नियोजनाचे धडे

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 2 9 0 4

आगरी समाज संस्थेतर्फे शिक्षक दिनानिमित्त IES शाळा, वरसोलीत शिक्षकांना आर्थिक नियोजनाचे धडे

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

वरसोली, दि. ४ : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आगरी समाज संस्था, अलिबागतर्फे IES शाळा, वरसोली येथे शिक्षकांसाठी ‘माझा पैसा माझी जबाबदारी – अर्थात आर्थिक नियोजन’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री निलेश पाटील आणि सौ. शुभांगी म्हात्रे यांनी शिक्षकांना आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक शिस्त याबाबत मार्गदर्शन केले.

आगरी समाज संस्थेच्या करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन अभियानाची सुरुवात IES शाळा, वरसोली येथूनच झाली होती. संस्थेच्या विविध उपक्रमांनी प्रभावित होऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांसाठी उपयुक्त कार्यक्रम आयोजित करण्याबाबत संस्थेशी संपर्क साधला. त्यानुसार आर्थिक नियोजन ह्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आणि भविष्यासाठी महत्त्वाचा विषय असल्याने त्यावर मार्गदर्शन करण्याचे निश्चित करण्यात आले.

उपलब्ध ४० ते ४५ मिनिटांच्या कालावधीत आर्थिक नियोजनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. उत्पन्नाचे नियोजन, बचत, गुंतवणूक, आर्थिक शिस्त आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी नियोजन यांसारख्या विषयांवर उपस्थित शिक्षकांशी संवाद साधण्यात आला.

कार्यक्रमासाठी आगरी समाज संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुनील तांबडकर, सचिव श्री. प्रभाकर ठाकूर आणि सौ. दिपश्री पाटील यांची उपस्थिती होती.

आर्थिक नियोजनासारख्या महत्त्वपूर्ण आणि दैनंदिन जीवनाशी निगडित विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी आगरी समाज संस्थेने पुढाकार घेतल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. किरण पाटील यांनी संस्थेचे आभार मानले. तसेच आगरी समाज संस्था राबवत असलेल्या विविध अभिनव सामाजिक, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिक्षकांनी विविध प्रश्न विचारून आर्थिक नियोजनाबाबत अधिक माहिती जाणून घेतली. आर्थिक नियोजन, गुंतवणूक आणि बचतीबाबत आवश्यकतेनुसार पुढील काळातही मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

आगरी समाज संस्था सामाजिक कार्याबरोबरच करिअर, शैक्षणिक मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रांतही विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

अशाप्रकारचे उपक्रम आपल्या गावात, शाळेत अथवा कंपनीमध्ये राबवण्यासाठी श्री निलेश पाटील ९५२७३०८१३३ यांच्याशी संपर्क साधावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे