
0
6
2
9
2
1
पाऊस
ग्रीष्म दाह शमविन्या
धाड नभा पाऊस
असह्य होती वेदना
नको परीक्षा पाहूस
प्रिय सख्याच्या भेटीसाठी
आतुरले माझे मन
बरसु दे प्रिय घना
प्रीतीचे सावळे घन
विरहाचा हा वणवा
जाळी नाजूक कायेला
मन अधीर आतुर
झाले सख्याच्या भेटीला
युगापरी वाटे मज
एक एक हा दिवस
प्रणायात भिजविन्या
मेघा बेधुंद बरस
प्रीतीचं दान घेऊनी
आला पाऊस धावून
सुखावली सृष्टी सारी
मिठीत त्याच्या पाहून.
इंदू मुडे, ब्रम्हपुरी
जिल्हा चंद्रपूर
0
6
2
9
2
1



