
0
6
2
7
9
8
टांगेवाला
टपटप टाकीत टापा
चाले घोडा अलबेला
लाल टोपी हाती चाबूक
आला राजू टांगेवाला.
सखा घोडा फार हुशार
खात नाही चाबूक वार
नुसता याला पुरे इशारा
दावी आपला तोरा.
गळ्यात खुळखुळ चाळ
पायी घातला तोडा
डोईवरती तुरा शोभला
दुडू दुडू धावे घोडा.
“कुठे जायचे लवकर बोला
टांगा तुमच्यासाठी खास”
विनवुन बोले टांगेवाला
पोटापुरते द्या गरिबास.
चाळ वाजे खुळू खुळू
टांगेवाला गाई गाणी
टपटप तबला साथीला
ओठात रसाळ वाणी.
सौ विमल धर्माधिकारी
वाई, सातारा
=======
0
6
2
7
9
8


