Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजीनगरमराठवाडासाहित्यगंध

बुद्धीदाता

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 6 2 8 0 7

बुद्धीदाता

बाप्पा तुझ्या उत्सवात
उत्साहाला खळखळाट
सनई चौघडे कालबाह्य
अन् डिजेचा सुळसुळाट .. //

ऐकू येईना मंजुळ नाद
पाहावे तिथे थयथयाट
हरवलीय लय,ताल,सूर
भेसूर,कर्कश,गडगडाट.. //

बंद पडेल ह्रदय स्पंदन
असा रौद्र खणखणाट
जाणवेना मधूर कंपण
साहवेना क्रूर दणदणाट.. //

समजेना ना उमजेना
होई नुसता जळफळाट
अशी कशी ही आराधना
ज्यात जीवाचा थरथराट.. //

मनभावन मनप्रसन्न वाटे
असाच असावा थाटमाट
गणराया तूच बुद्धिदाता
येवू दे परिवर्तनाची लाट.. //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 8 0 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे