0
4
8
2
9
4
कर्तव्याने घडतो माणूस
कर्तव्याने घडतो माणूस
असावे सदा ध्येयवादी
पावलांना बळ मिळेल
राहिलो जर आशावादी …१
आधी काम मग आराम
लक्षात ठेवावे कायम
आली कष्टदशा अपार
मनी असावा संयम …२
कर्तव्यास चुकू नये
कर्म हीच पूजा
निष्ठा असावी कार्याप्रती
नकोच विचार दूजा …३
कर्मण्ये वाधिकारस्ये
मंत्र ध्यानी ठेवावा
झोकून द्यावे कार्यालागी
यशस्वी भविष्याचा वेध हवा…४
कर्तव्याने घडतो माणूस
थोरांची वचने स्मरावी
यशाची फळे चाखण्यासाठी
प्रयत्नांची कास धरावी …५
श्री.पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे
0
4
8
2
9
4



