0
4
8
2
8
6
परीचे गाव
परीचे गाव,परीचे गाव
नाव त्याचे सावरगाव
मिळतात तेथे मोठमोठे पाव
त्याच्यासंगे काय खाव?
परीच्या हाती जादूची छडी
फिरवतात आला एक गडी
गड्याने मारली लांब उडी
काढली त्याने मोठी पुडी
पुडीत होता भरपूर खाऊ
खाऊ लागले दोन भाऊ
जवळच होती बसली आऊ
म्हणाली मी खायला येऊ
खाऊ घेतला खायला
परीच्या गावात गेलो फिरायला
ससा लागला लगेच पळायला
कुत्रा लागला शेपटी हलवायला
परीच्या गावात झाडे खूप
झाडावरची माकडे करती हूपहूप
आजीने दिले खायला गुपचूप
सगळे बसले चिडीचूप
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
8
6



