Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरपरीक्षण लेखसाहित्यगंध

“आभारीय मनोगत”; विष्णू संकपाळ

0 4 8 3 0 0

आभारीय मनोगत”; विष्णू संकपाळ

मराठीचे शिलेदार समूह
प्रतिभावंतांचा महा दरबार
येथे मी एक मामुली शिपाई
ठरलो सन्मानाचा हकदार!!

आज पहाटेच आ. राहुल दादांचा “तुमचा फोटो पाठवा” हा मेसेज दिसला. आजकाल सात मे च्या कार्यक्रमाची धावपळ असल्याने फोटो कशासाठी हे लक्षातच आले नाही.. मात्र थोड्याच वेळात समूहात ‘प्रतिभावंत’ रचनेचे सर्वोत्कृष्ट पोष्टर झळकलेले पाहिले आणि सुखद धक्का बसला..!!

विषय खूपच सुंदर आणि आवडीचा होता त्यामुळे व्यस्ततेतूनही सवड काढून जे लिहिले ते परिक्षकांना भावले आणि शब्दांचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले. कोणत्याही कलेची प्रतिभा थोडी जन्मतःच, थोडी नैसर्गिक असली तरीही तिला योग्य गुरूच्या सानिध्यात पैलू पाडावे लागतातच. तेव्हाच ती परिणामकारकपणे विकसित होते आणि जनमानसात लौकिकास प्राप्त होते.

दुसरी गोष्ट म्हणजे अशी कोणतीही कला स्पर्धेच्या अग्निदिव्यातून गेल्याशिवाय तीचे खरेपण सिद्ध होत नाही.. आणि अस्सल प्रतिभा कोणत्याही अग्निदिव्यास एका पायावर तयार असते.

मात्र आजकाल कुठेही काॅपी करणे, चोरी करणे, लबाडी करणे, किंवा शिफारशींच्या कुबड्या वापरून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न सर्रास दिसतो.. मात्र हा प्रकार तकलादू ठरतो चिरंतन टिकत नाही.. हाच आशय मी गुंफण्याचा प्रयत्न केला. असो.

येत्या सात मे रोजी छ. संभाजीनगर मध्ये काव्यस्पर्धेचे अग्निदिव्य पार करण्यास सर्व शिलेदार बंधू भगिनींनी सिद्ध रहावे. स्पर्धेशिवाय कला गंजून जाते. तीला झळाळी येण्यासाठी निकोप स्पर्धा खूप आवश्यक असते. ज्यात आपल्या प्रतिभेचा कस लागतो आणि स्वतःकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन लाभतो. सात मे चा कार्यक्रम निव्वळ स्पर्धा नसून जवळपास दिड डझन पुस्तकांचे प्रकाशन दिमाखदार सोहळ्यात संपन्न होणार आहे.. याचा साक्षीदार व्हावेच लागेल.

समूह प्रमुख आदरणीय राहूल दादा किंवा प्रशासकीय टिम आवाहन करतात म्हणून नव्हे तर.. माय मराठीचा इमानदार शिलेदार म्हणून इथे येणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. मातृभाषेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा एक खारीचा वाटा उचलला पाहिजे.. मराठीचे मुले म्हणून भावी पिढीच्या हाती समृद्ध वारसा सुपुर्द करण्यासाठी वचनबद्ध आणि संकल्पसिद्ध होवूया… चला अभिजात मराठीचा गौरव अटकेपार गाजवूया.

माझ्या प्रतिभावंत रचनेचा यथोचित गौरव केल्याबद्दल आ. राहूल दादां, आ. पल्लवीताईजी, मुख्य परिक्षक आ. सविताताईजी, आ. स्वातीताईंजी, आ. वैशालीताईसाहेब, आ वृंदाताईजी, आ. संग्राम दादा, आ. उरकुडे सर जी, आ. अशोक दादा, आ. शर्मिलाताईजी, आ. तारकाताईजी या सर्व मान्यवरांचे अंतःकरणपूर्वक खूप खूप आभार. तसेच मला अभिनंदनीय शुभेच्छा देऊन उपकृत केल्याबद्दल सर्व समूह सहकार्‍यांचे सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद..

भेटू सात मे रोजी छ. संभाजीनगर

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे