सिर्सी येथे श्रीसंत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात
प्रतिनिधी अखिल राजू रोडे
सिर्सी येथे श्रीसंत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात
बेला येथील नवनियुक्त ठाणेदार उमेश नासरे यांची पुण्यतिथी सोहळ्यात भेट
श्री संत संताजी जगनाडे पालखी सोहळ्याचे परिसरात कौतुक
प्रतिनिधी अखिल राजू रोडे
नागपूर/ सिर्सी: (दि १८): सिर्सी गावात तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
भव्य पालखी शोभायात्रा:
श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पालखी जगनाडे महाराज देवस्थान येथुन निघून गावातील मुख्य रस्त्यावरून फिरत पुन्हा देवस्थानात समापण झाले.या पालखी सोहळ्यात गावातील व परीसरातील अनेक भजन मंडळीनी हजेरी लावत ट्राळ मृदुंगाच्या तालावर नाचत फुगळी खेळत पालखी शोभायात्रेचे आनंद लुटला.पालखी सोहळ्यात गावातील सरपंच वंदना बुटे उपसरपंच अतुल नारनवरे यांच्या सोबत प्रतिष्ठीत नागरीक व नेते मंडळी यांची उपस्थिती दिसून आली. “जय संताजी” “जय संताजी” जयघोषाने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.तेली समाजातील नामवंत उद्योजक ,व्यापारी ,युवा कार्यकर्ते यांनी सर्वात मोठा पालखी सोहळा यशस्वी करून दाखवला.
राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. डॉ विष्णू महाराज ब्राह्मणवाडे यांचे हस्ते महाकाल्याचे कीर्तन :
ह.भ.प. डॉ विष्णू महाराज ब्राह्मणवाडे यांच्या महाकाल्याच्या कीर्तनाला परीसरातील अनेक भाविकांनी गर्दी केली होती. जगनाडे महाराज यांच्या कार्याला उजेडा देण्यात आला.
भव्य महाकाल्याचे आयोजन :
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेला पोलिस स्टेशन येथिल नवनियुक्त ठाणेदार श्री उमेश नासरे यांनी संत जगनाडे महाराज यांचे दर्शन घेतले व आपल्या कर्मचाऱ्यासह महाप्रसाद आस्वाद घेतला.
संत शिरोमणी जगनाडे महाराज देवस्थानाला मान्यवरांचा भेटी :
श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त परीसरातील अनेक नेते मंडळी व मान्यवरांची देवस्थानाला भेटी व देवस्थान पंचकमिटी तर्फे सत्कार करण्यात आला. बेला पोलिस स्टेशन निरीक्षक श्री उमेश नासरे , तेली समाजाचे नेते गंगाधर रेवतकर, जगदीश वैद्य , यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मुकेश झाडे, धनराज मांगरुडकर , मुकेश झाडे, नंदू पडोळे, सावित्री ताई ढोबळे यांची उपस्थिती होती.
तेली समाजातील युवकांचे मोलाचे सहकार्य :
भव्य पालखी शोभायात्रा व महाप्रसाद आयोजनात तेली समाजातील प्रत्येक समाजबांधवाने मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे युवा उद्योजक , सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर मुकेश झाडे, विठुभाऊ मांगरुडकार, दिनेश येवले, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर झाडे, दिनेश येवले, मंगेश चुटे,राजू फटिंग, नारायण मेहर , सुनील वरघने, सचिन तेलरांधे, देवानंद येवले,राहुल येवले, नंदुभाऊ पडोळे , नंदू ढोके, तेजस डुकरे , शेषराज पिसे, पुंडलिक कामडी, विलास कापसे इत्यादी समाज बांधवांनी पुण्यतिथी सोहळा उत्साहात घडवून आणला.



